जुन्नर हा तालुका ओझर लेण्याद्री आणि शिवनेरी या प्रमुख तीन ऐतिहासिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे
परंतु जुन्नर मध्ये असलेल्या 108 पर्यटन ठिकानांबाबत जास्त काही बोललं जातं नाही ही पर्यटन ठिकाणे जास्त प्रसिद्धीस उतरले नाही
असच एक जुन्नर मधले एक ऐतिहासिक ठिकाण आणि ते म्हणजे
जुन्नर चा ताजमहाल
उर्फ जुन्नर चा सौदागर घुमट किंवा हबशी घुमट
नारायणगाव ते जुन्नर हायवेने जुन्नरला आलात कि याच रस्त्यावर विशाल दगडी वेस जुन्या एस.टी स्टॅन्ड जवळ बांधण्यात आली आहे. याच वेशीच्या पूर्वेकडे तोंड करून उभे राहिले की एक आमरापुरकडे जाण्यासाठी डांबरी रस्ता आहे. याच रस्त्याने सरळ पूर्वेकडे साधारणतः सव्वा कि.मी गेलात की आपणास डावीकडे या विशाल वास्तूचे दर्शन घडते. असे म्हटले जाते की हा सतराव्या शतकातील निजामशाही राजवटीत मुघलकालीन स्थापत्य शैलीचा एक अनोखा देखावा आहे.
जुन्नर मधुन विघ्नहर सहकारी साखर कारखाना रस्त्यावर डावीकडे हापुसबाग जवळ असलेला चारही बाजूने हिरव्यागार शेतांच्या मधीमध असलेला हा जुन्नरचा ताजमहाल चारही बाजूने समान एकदम काही सेकंदात मनाला भुरळ पाडणारी ही विलक्षण कलाकृती खरोखर जुन्नर च सौंदर्य म्हणावं लागेल
पण या कलाकृती बाबत जास्त काही लिहिलं गेलं नाहीं किव्हा जास्त काही प्रसिद्धी मिळाली नाही
सन 1490 च्या कालखंडात बहामनी सुलतानाचा सरदार मलिक अहमद याने जुन्नर परिसरात निजामशाहिची स्थापना केली होती. त्यानंतर वाढत्या साम्राज्याला सोयीस्कर अशा राजधानीसाठी पुढे निजामशाहिची राजधानी नगरला नेण्यात आली. हीच ती इतिहास प्रसिद्ध निजामशाही.
निजामशाहितील मातब्बर सरदार शहाजीराजे यांच्याशी अंतर्गत वर्चस्वातून शत्रुत्व पत्करणार्या निजामशहाचा वजीर मलिकांबर याचा संबंध सौदागर मुंबज या वास्तूशी असल्याचे सांगीतले जाते.
जामशाहाचा वजीर असलेल्या मलिकांबर हा आफ्रिकेतून भारतात आला होता. तत्कालीन जुन्नर शहरापासून जवळ असलेल्या हबशीबागेत (सध्याचे हापुसबाग ) त्याचे वास्तव्य होते. जुन्नर शहरात त्याने आदर्श अशी मलिकांबर पाणीपुरवठा योजना त्या काळात राबविली होती. त्याचे अवशेष आजही पहावयास मिळतात.
गृहकलहामुळे पित्याविरूध्द बंड करणार्या दिल्लीचा शहजादा शाहजान पत्नी मुमताज आणि दोन वर्षाचा औरंगजेब यांच्यासह याच महलात मलिकांबराकडे आश्रयार्थी म्हणुन आल्याचा, राहिल्याचा इतिहास सांगतो.
य मलिकांबर महालाच्या समोरच सध्याच्या जुन्नर - शिरोली रस्त्यावर हापुसबाग परिसरात उंचवट्यावर अंदाजे 60 फुट लांब, 60 फुट रुंदीची घडीव दगडी बांधणीतील चौरसाकृती वास्तू पाहणार्यांचे लक्ष वेधून घेते. चौरसाकृती 50 फुट ऊंचीच्या भिंतींनी त्यांच्यावर 30 फुट उंचीचे, तर 25 फुट त्रिजेचे आकर्षक घुमट तोलुन धरलेले आहेत.
इमारतीच्या दर्शनी बाजुच्या भिंतीवर दोन टप्प्यात कमानीची रचना असून दगडात घडविलेले नक्षीदार प्रवेशव्दार आणि जाळीदार खिडक्या आकर्षक आहेत.आतील बाजूवर फारशी भाषेतील मजकूर कोरलेला आहे. त्याचा अद्याप अर्थबोध झालेला नाही.आतमध्ये हबशी प्रमुखाच्या व त्याच्या कुटूंबियांच्या 9 कबरी आहेत.
इमारतीचे देखनेपण व वैभवावरून खास व्यक्तींच्या कबरीवर बांधलेले हे स्मारक कोणा मोठ्या असामीचे किंबहुना मलिक अंबरच्या कुटूंबापैकी कोणाचे स्मारक असण्याची शक्यता असल्याबाबत वर्तविली जाते. सध्या इतिहासप्रेमी तसेच पर्यटकाच्या नजरेपासून दुर दुर्लक्षित अवस्थेत ही इमारत उभी आहे.
तुम्हालाही जर कधी ताजमहाल बघायची इच्छा झाली तर नक्की एकदा जुन्नरला भेट द्या
हबशी घुमटाकडे जाण्याचा मार्ग
जुन्नर – ओझर राष्यावर अमरापूर विठ्ठलवाडी (हापूसबाग रोड / जुन्नर – कारखाना रोड) जवळ सौदागर घुमट नावाची ऐतिहासिक वास्तू आहे. जुन्नर वेशी पासून कारखाना रोड ने पुढे गेल्यावर १ km अंतरावर डाव्या बाजूला लगेच वास्तू दिसते.
धन्यवाद
-संग्रह-नवल्या आर्ट्स
إرسال تعليق