जगातला सर्वात मोठा इतिहास घडवणारे छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या शिवनेरी चा ही एक थरारक आणि पावन इतिहास आहे .


शिवजन्मापूर्वीचा शिवनेरीचा इतिहास

जुन्नर प्रांताला एक हजार वर्षांचा समृद्ध आणि भरभराटीचा तसेच चित्तथरारक इतिहास लाभलेला आहे . त्यातलाच एक भाग म्हणजे शिवनेरीचा इतिहास .

शिवनेरी

जिमा नगर (जुन्नर) हे दोन सहस्त्रा वर्षापासून एक महत्वाचे राजकीय आणि व्यापारी केंद्र राहिले आहे . जिमा नगर (जुन्नर) हे भारतीय रोमन व्यापारी काळात कोकण आणि देश यांना जोडणारा अतिशय महत्वाचा व्यापारी मार्ग म्हणून प्रसिद्ध होता . 

Naneghat

त्याकाळात जगभरातले व्यापारी हे मुंबईच्या कल्याण बंदरावर आपला माल घेऊन व्यापार करण्यासाठी येत असे . जुन्नरच्या नानेघाटामधून सगळे व्यापारी जुन्नरमार्गे पैठण ला व्यापार करत करत जात असे . 

नाणेघाट मधील दगडी रांजण

नानेघाटामधून माल पुढे नेण्यासाठी तसेच व्यापार करण्यासाठी या व्यापाऱ्यांकडून कर वसूल केला जायचा आणि त्या साठी तिथे दगडी रांजणे ठेवली जायची 

नाणेघाट मधील दगडी रांजण

प्राचीन  काळामध्ये  जुन्नर हे ' जिमा नगर ' नगर म्हणून सर्वत्र  

प्रसिद्ध  होते . जुन्नरला 'जुन्नेर' असही संबोधलं जायचं .

जिमा नगर हे शक राजा नहपान यांच्या अधिपत्याखाली होते .इ.स 124 शक राजा महपान यांच्या मंत्रीपदावर असणारा 'अयाम' यांचा जुन्नरच्या एक पोकळीमध्ये शिलालेख सापडला आहे त्यानुसार महपान राजाला महाक्षत्रप म्हटले आहे . या शिलालेखवरून शक राजा महपान यांची महती आणि वर्चस्व सिद्ध होते .

Junnar

जुन्नर मध्ये व्यापार असाच वाढत जावा जुन्नर प्रांताची अशीच भरभराट होत राहावी अशी त्या त्या काळातील राजवटींच्या राजांना वाटत असे परंतु काही काळानंतर नानेघाटामध्ये चोरी लूटमारी अशे प्रकार घडू लागले . 


बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांना लुटले जाऊ लागले याचा ख्वाडा कुठेतरी जुन्नरच्या भरभराटीला लागला .या लुटमाऱ्यांपासून कपटांपासून सौरक्षण व्हावे यासाठी  जीवधन ,चांवड,निमगिरी,भैरवगड,हडसर,नारायणगड,कोंबडकिल्ला,शिंदोला, आकोबा, रांजनगड यांसारख्या किल्ल्यांची निर्मीती झाली .

शिवनेरी

गौतमीपुत्र शतकर्णी हा सातवाहन वंशाचा सर्वात मोठा शासक होता.सातवाहन राजा गौतमीपुत्र शतकर्णी यांनी शकांचा नाश केला आणि जुन्नर आणि परिसरावर आपले राज्य स्थापन केले .

Gautamiputr shatakarni
जुन्नर मध्ये होणाऱ्या लुटमाऱ्यांवर  वचक ठेवण्यासाठी तसेच नाणेघाटावरील व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी गौतमीपुत्र राजा सातकर्णी यांनी शिवनेरी किल्ला बांधला

Shivneri


शिवनेरीचा शिवजन्मापर्यंतचा प्रवास -


सातवाहन राजा शतकर्णी नंतर शिवनेरी चालुक्य राष्ट्रकूट या राजवटीच्या सत्तेखाली गेला

यादवांनी  1170 ते 1308 च्या काळात जुन्नरवर आपले राज्य स्थापन केले . 

याच काळात खऱ्या शिवनेरीला गडाचं स्वरूप आलं .

Shivneri

पण यादवही जास्त काळ जुन्नरवर ताबा मिळवू शकले नाही 

1443मध्ये मलिक-उल-तुजार याने यादवांचा कडाडून पराभव केला आणि जुन्नर आपल्या ताब्यात घेतला शिवनेरीला सर केलं.

 

 निजाम-उल-मुल्क ह्या बहामनी सुलतानाच्या सरदाराची बिदर शहरात दरबारी १४८६ साली हत्या झाली ह्या प्रकारामुळे चिडलेल्या त्याच्या मुलाने -मलिक अहमद- सल्तनीपासून फुटून स्वतंत्र राज्याची घोषणा केली आणि आणि 1486 ला निजामशाहीची स्थापना झाली आणि  जुन्नर हे आपल्या राजधानीचे शहर निश्चित केलेआणि शिवनेरी आपल्या ताब्यात घेतली .

1493 ला निजामशाहीची राजधानी शिवनेरी वरून अहमदनगरला हलवण्यात आली 


 सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला 1565 मध्ये शिवनेरी गडावर कैदी म्हणून ठेवले होते .


 मालोजी राजे भोसले यांनी जुन्नर प्रांत 1595 मध्ये काबीज करून घेतला त्याबरोबर शिवनेरी ही सर केला


शिवनेरी गडाचा  सुवर्ण काळ सुरू झाला होता . वाट राहिली होती ती फक्त शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाची .याच काळात जिजाऊ मासाहेब गरोदर होत्या जाधवरावांनी जिजाऊंना सुरक्षेच्या दृष्टीने शिवनेरी किल्ल्यावर हलवले होते 

शके  होते 1551 शक्ल नाम संवत्सरे फाल्गुन वैद्य तृतीयेला वार होता शुक्रवार ,सूर्यास्तानंतर जुन्नरचे नशीब पालटले शिवनेरी वर स्वर्ग अवतरला दुष्कालाळाही कोंब फुटले आणि जुन्नरच्या स्वर्गात 19 फेब्रुवारी इ.स 1630  रोजी देवाचा, रयतेच्या कैवारी चा जन्म शिवनेरीवर झाला. 

शिवनेरी पावन झाली.


अवघे दोन वर्षे शिवाजी महाराजांनी शिवनेरीच्या कुशीत जुन्नरच्या मातीत काढले . यानंतर खर तर जुन्नरला शिवनेरीला एक वेगळी ओळख प्राप्त झाली 

Shivaji maharaj

शिवजन्मानंतरचा शिवनेरीचा इतिहास


1632 मध्ये शिवरायांनी शिवनेरी गड सोडला.शिवनेरीला सोन्याचे दिवस आले होते पण ते जास्त काळ टिकले नाही 


1637 मध्ये शिवनेरी मोगलांच्या ताब्यात गेली 

Shivneri

1673 मध्ये शिवरायांनी शिवनेरीचा किल्लेदार आजीजखान यांवर चालून जायचा प्रयत्न केला त्याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा प्रयत्नही केला परंतु शिवाजी महाराज या कार्यात अयशस्वी ठरले 


1678 मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला 


पुन्हा एकदा मराठ्यांनी शिवनेरी ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला परंतु  पुन्हा त्याच्या ताब्यात अपयश आले 


40 वर्षांच्या भव्य कालावधीनंतर 1716 मध्ये शाहूमहाराजांनी शिवनेरी गड मराठ्यांच्या ताब्यात आणला 

नंतरच्या काळात शिवनेरी पेशव्यांना हस्तांतरित करण्यात आली 


असा आपल्या शिवनेरीचा इतिहास अगदी थरारक आणि पावन  

शिवनेरी हा एक स्वतंत्र स्वर्ग आहे ज्या मध्ये देवाने जन्म घेतला आहे 

आपल्या स्वर्गाला अजून शेकडो वर्षे भावी पिढीसाठी त्यांना मिळणाऱ्या प्रेरणेसाठी जपून आणि खूप काळजी पूर्वक ठेवायचं आहे 

त्यामुळे शिवनेरी वर गेल्यावर तिथली स्वछता ही आपली जवाबदारी आहे तिथे कोणत्याही वस्तूला कोणत्याही प्रकारे काही नुकसान होणार नाही ही आपली जवाबदारी आहे त्यामुळे आपल्या मनाला आपल्या स्वाभिमानाला म्हणजेच शिवनेरी गडाला आपल्या भावी पिढीसाठी प्रेरणेचा स्तोत्र बनवूया आपल्या शिवनेरीला जगवूया .....


| शिवनेरी |


संग्रह-नवल्या आर्टस्


.


Post a Comment