महाराष्ट्राचा स्वर्ग तसेच महाराष्ट्राचा पहिला पर्यटन तालुका जुन्नर | जुन्नर तालुक्याला निसर्गाचं वरदान भेटलेल आहे असेच म्हणावे लागेल , जुन्नर च्या चहू बाजूंनी निसर्गसौंदर्य डोळ्याचे दीप उजाळून टाकते .

असच एक ठिकाण जुन्नर तालुक्यातील उंचखडक गावात 'खबडी' ' या  नावाने प्रसिद्ध आहे   



या ठिकानाच नावच सर्व पर्यटकांचं लक्ष वेधून घेत . भैरवनाथ महाराजांची कृपा असलेलं हे उंचखडक गाव सांस्कृतिक तसेच नैसर्गिक  दृष्ट्या आकर्षक आहे । चहू बाजूंनी पसरलेले डोंगर या ठिकाणची शोभा वाढवते | विविध जातींचे फळे फुले तसेच जंगली प्राणी या ठिकाणी जास्त प्रमाणात आढळून येतात



 ।  खबडी च्या डोंगरांच्या माथ्याला बदरदिन बाबाचे मंदिर अवघ्या दूरवरच्या डोंगरावरून स्पष्ट पणे आकर्षक दिसते | खबडीतले अजून एक आकर्षक स्थळ म्हणजे खिंडीतील भैरोबाचे मंदिर तसेच पालथा मारुती ।



खबडी हे ठिकाण परिपूर्ण पणे एक निसर्गरम्य आकर्षक ,अद्भुतरम्य ,विलक्षण , तसेच डोळ्यात व मनात घर करून राहणारे ठिकाण आहे
पावसाळ्यात हे ठिकाण सौंदर्याच्या पराकोटीला पोहचते ।

आकर्षक धबधबे विविध रंगी पक्षी इकडे टिकडे उड्या मारत फिरणारे मोर तसेच अचानक दिसणारे जंगली प्राणी त्यात बिबट्या इ. काही आकर्षणे या ठिकाणी बघायला मिळतात . 
शब्दांमध्ये कितीही वर्णन केले तरी त्या ठिकाणचा खरा आनंद प्रत्यक्ष भेट देण्यात आहे 
त्यामुळे एकदा खबडी ला नक्की भेट द्या 



खिंडीतला भैरोबा 



पण पर्यटनाला येत असताना त्या ठिकाणी कचरा वगैरे टाकून त्या सौंदर्याला डाग पडणार नाही याची ही काळजी सर्व पर्यटकांनी नक्की घ्यावी हीच विनंती
धन्यवाद

Life is not only to survive but to communicate with Nature 

writer- देवेश कणसे

Watch the teaser of khabadi on Navalya Arts Visuals Youtube chanel
उंचखडकाच्या खबडीची एक झलक | Teaser 1
👇👇👇👇👇👇👇

Post a Comment